प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या घटनेचा आढावा संक्षिप्त मध्ये वाचा.....
दापोडी....
पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा मांजा नागरिकांसाठी धोकादायक आहे. दापोडी येथे पतंगाचा कट झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मांजात अडकून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून गळ्याला लहान जखम झाली. अन्यथा मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता होती. सोमवारी दि. ४ रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेट समोर दापोडी येथे ही घटना घडली.
भोसरी....
हुंदाई कंपनीचे स्वामित्व असलेल्या हुंदाई कंपनीचे वेगवेगळे बनावट पार्ट विकणा-या एका दुकानदारावर फसवणूक आणि कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दि. ५ रोजी दुपारी चार वाजता पोपटलाल डी मेहता स्पेअर पार्टस दुकान, कासारवाडी येथे घडली.
पिंपरी....
गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५२७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दि. ५ रोजी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास म्हातोबानगर वाकड येथे करण्यात आली.
चाकण....
खेड तालुक्यातील येलवाडी गावच्या हद्दीत चाकण-तळेगाव रोडवर भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी दि. ५ रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली
*गुलाब विठ्ठल जाधव ३८वय, रा. कोटोरेवाडी, पोस्ट. इंदुरी, ता. मावळ, रिदू ख्रिस्टराज फ्रान्सिस वय २१ रा. कोहिनुर लॉज, येलवाडी, ता. खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे