प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
एक व्यक्ती बस थांब्या वर बसची वाट पाहत थांबलेला असताना त्या व्यक्तीला पाच जणांनी विनाकारण वायरने मारहाण केली. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शनी मंदिर बस स्टॉपजवळ वाकड या ठिकाणी ही घटना घडली.
अय्युबकादर अफझल मुजावर वय ४१ रा. नेरे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुशेन मोहन खामकर वय 27, रा. काळेवाडी फाटा, पुणे , त्याचे दोन साथीदार, भाऊ राहुल मोहन खामकर रा. काळेवाडी फाटा, पुणे अंतेश्वर कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुजावर ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वाकड येथील शनी मंदिर बस स्टॉपजवळ बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी एका कारमधून आरोपी आले. त्यातील एकाने फिर्यादी यांना ‘भैया आपको किधर जाना है’ असे विचारले. त्यावर फिर्यादी यांनी कुठेही जायचे नसल्याचे सांगितले.
यावरून आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही मला शिवी देऊ नका’ असे फिर्यादी यांनी आरोपींना समजावून सांगितले. त्यानंतर कारमधून उतरून आरोपींनी केबल वायरने फिर्यादी यांच्या पाठीवर, हातावर, चेह-यावर मारून शिवीगाळ केली. तसेच आरोपींच्या कारचा फोटो काढत असताना ‘पोलीस कम्प्लेंट केली तर तुला अजून भरपूर मारीन’ अशी आरोपींनी धमकी दिली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहे