प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या गुरुवारपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. नागरिकांनी मंदिरात कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतची नियमावली महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केली आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या गुरुवारपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. त्यासाठीची नियमावली पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केली आहे.
*पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे गुरुवारपासून मंदिर,मस्जिद,चर्च,गुरुद्वारा,व सर्व धर्म स्थळे व्यवस्थापन, ट्रस्ट, ऑथॉरिटीने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहतील .धर्म स्थळात नागरिकांनी मास्कचा वापर, थर्मल स्क्रिनिंग, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्डवॉशचा वापर करावा. तसेच सुरक्षित अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या २४ सप्टेंबरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.