प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
यूट्यूबवर व्हिडीओ बघून एटीएम फोडणा-या दोघांना वाकड पोलिसांनी केली अटक,तरुणांना काम धंदे करायचे नाही दिवस भर ऑनलाईन युट्यूब वर काही प्रमाणात गुन्हे करण्याचे विडिओ बघून तरुण पिढी गुन्हेगारी कडे वळतीयही बाब अतिशय गँभीर आहे, त्या तरुणांवर अजून नऊ गुन्हे उघड झालेले आले आहेत.
महादेव प्रकाश तिर्थे वय १९ रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मुळगाव- लातुर आणि निशांत ज्ञानेश्वर गुळुंजकर वय २४, रा. चिंतामणी चौक, चिंचवड असे अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी एटीएम फोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. याबाबत वाकड पोलिसांना एटीएम फोडणारे दोन गुन्हेगार आदित्य बिर्ला हॉस्पीटल, थेरगाव येथे येणार आहेत अशी माहिती मिळाली. वाकड