क्राईम न्यूज : दुचाकी चोरून त्यांची बनावट पेपर तयार करून विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस , चिखली पोलिसांनी चौघांना अटक केली.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली, पिंपरी , निगडी परिसरातून दुचाकी चोरून त्यांची बनावट कागदपत्रे बनवून त्या खानदेश आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवून दिल्या जात होत्या या बाबत तपास करत चिखली पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १९ लाख २२ हजारांच्या ६१ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. ही टोळी केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरून त्याची विक्री करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मागील आठ ते दहा महिन्यांमध्ये वाहन चोरट्यांनी पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीचा सपाटा लावला होता. अनेक दिवसांपासून पोलीस वाहन चोरट्यांचा माग काढत होते. दरम्यान चिखली परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक विश्वास नाणेकर व चंद्रशेखर चोरघे यांना माहिती मिळाली की, गोविंद सोळंकी आणि संदेश जाधव यांच्याकडे चोरी केलेल्या दुकंगकी असून ते दोघेजण एका बुलेटवर जॉगर्स पार्क स्पाईनरोड येथे येणार आहेत. बुलेटवरून दोघेजण येत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना हटकले. पोलिसांना पाहून दोघेजण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी गोविंद आणि संदेश या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे असलेल्या बुलेट बाबत चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस ठाण्यात आणून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच गोविंद आणि संदेश या दोघांनी त्यांचे आणखी दोन साथीदार सहाम आणि आदिनाथ यांच्यासोबत मिळून बुलेट चोरली असल्याचे सांगितले. तसेच चौघांनी मिळून पिंपरी, चिखली, निगडी परिसरातून आणखी दुचाकी चोरून त्याची बनावट कागदपत्रे बनवून त्या खानदेश आणि मराठवाड्यात विक्रीसाठी पाठवल्या असल्याचे सांगितले.

गोविंद मूलचंद सोलंकी (वय २५ रा. अजंठानगर, पत्र्याचे शेड, चिंचवड पुणे. मुळगांव- छाप्रा पोष्ट छोटाटिगरीया, ता. जि. देवास, मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय २८, रा. गोकुळ हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली), सहाम अब्दुल शेख (वय २६, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली पुणे), आदिनाथ अशोक राजभोज (वय १९, रा. अजंठानगर, पत्र्याचे शेड, पाण्याचे टाकीजवळ निगडी) या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सजंय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उप निरीक्षक विवेक कुमटकर, सहाय्यक पोलीस फौजदार आनंद चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन सावंत, सुनील शिंदे, बाबा गर्जे, किसन वडेकर, चंद्रशेखर चोरघे, विश्वास नाणेकर, विपुल होले, गणेश टिळेकर, कबीर पिंजारी, नूतन कोंडे, संतोष सपकाळ यांनी केली आहे.



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post