प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शेतकऱयांच्या अमानुष व क्रूर पणे केलेल्या हत्येच्या निषेधार्थ धरणे आंदोलन यशस्वीपणे पार पडले.
उत्तर प्रदेश लखीमपूर येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपच्या केंद्रीय मंत्री पुत्राने धावते वाहन अंगावर घालून काही शेतक-यांना चिरडू,क्रूरपणे ,अमाणुसरीत्या ठार केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सोमवार ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन केले.
*महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला आज सोमवार चा महाराष्ट्र बंद नागरिकांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.*
समाजातील सर्व घटक केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणांमुळे चिडून आहेत. इंधना ची जीवघेणा दरवाढ त्यामुळे महागाई आणि वाढती बेरोजगारी यामुळे, वाढत्या आमहत्या,जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून केंद्र सरकार विरुध्द सर्वत्र राग आहे. याचा उद्रेक म्हणून सोमवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला असा दावा संजोग वाघेरे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केला.
शेतकरी संघटनेचे मागील एक वर्षा पासून शांतीपूर्ण पद्धतीने चालू असलेल्या आंदोलन कार्त्यांना आशा पद्धतीने मारणे हे लोक शाही चा गळा चेपी करणे आहे,देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना संविधानाणे धिलेला अधिकार हे कोणी ही त्यांच्या पासून हिरावून घेऊशकत नाही जर कोणी सत्ताधारी सत्तेच्या जोरावर अस करत असेल ? तर त्यानां जणताच त्यांची जागा दाखवेल,
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरुध्द घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. तसेच माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अरुण बो-हाडे, तानाजी खाडे तसेच कामगार नेते अनिल रोहम आदींनीही केंद्र सरकारचा निषेध करणारे भाषण केले.
*आज शहरातील विविध भागात कडकडीत बंद सकाळधरूनच दिसून येत होता, बाजार पेठेतील दुकाने बंद होती, रोडवर ही वर्दळ दिसून येत नव्हती,*
राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, विलास लांडे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटीका अॅड. उर्मिला काळभोर, नगरसेवक अजित गव्हाणे, डब्बू आसवाणी, डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, निकीता कदम, संगिता ताम्हाणे, सुमन पवळे उपस्थित होते.
माजी नगरसेविका शमीम पठाण, प्रशांत शितोळे, अरुण बो-हाडे, मारुती भापकर, जगदीश शेट्टी, सनी ओव्हाळ, प्रसाद शेट्टी, तानाजी खाडे, विजय कापसे, रमा ओव्हाळ तसेच विजय लोखंडे, फजल शेख, नरेंद्र बनसोडे, अनिल रोहम, अशोक मोरे, राजेंद्रसिंह वालिया, डॉ. वसीम इनामदार, नीरज कडू, वैशाली मराठे, अनुजा कुमार, उमेश खंदारे, तारीक रिझवी, सौरभ शिंदे, शाकीब खान, संदीप जाधव आदी उपस्थित होते.