प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल : सुनील पाटील :
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असलेली टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषने भारताकडून खेळताना ट्युनिशिया ओपनचे विजेतेपद पटकाविले आहे. स्वस्तिकाने 19 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात ही ‘सुवर्ण’ कामगिरी साकारली. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन व कौतुक केले. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, स्वस्तिकाचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते.
Tags
Panvel