निकृष्ट दर्जाचे काम फोडतोय सर्वानाच घाम : : धोक्याचा इशारा देणारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाताळगंगा ब्रिज




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील 

रसायनी पाताळगंगा इंडस्ट्रीज एरिया ऍडिशनल इंडस्ट्री एरिया या परिसरामध्ये भरपूर कंपन्या वसलेलया असून  या पुलावरून अवजड वाहने टू व्हीलर फोर व्हीलर सतत ये-जा करत असतात वर्ष दीड वर्षात या नवीन पुलाचे  कामकाज  पुर्ण झाले . आता जुन्या पुलाला  खड्डे पडले असल्यामुळे  नवीन पुलाचे वापर चालू आहे. परंतु म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस.

 नविन पुलावरच  खड्डा पडल्याचे दृश्य आपणास दिसत असून हे काम किती निष्कृष्ट दर्जाचे केले आहे या वरून दिसत आहे. सदरील कामाचे देखभाल करणारे इंजिनीयर कशा पद्धतीने काम पाहत आहेत ठेकेदारांची बिले कशी पास करीत आहेत  सक्षम अधिकारी दिसण्यात येत नाही जर असते तर रोड मध्ये टाकलेल्या लोखंडाच्या पट्टीने सिमेंट काँक्रीट मधून अंग सोडला नसता म्हणजेच निकृष्ट दर्जाचा काम करण्यात आले  हे खड्डा बघून दिसून येत आहे. ब्रिजचा रस्ता एकपदरी असून जर चुकून ओव्हरटेक किंवा येणारे जाणारे वाहन पडलेला खड्डा मधून आरल्या मूळे टू व्हीलर,  थ्री व्हीलर बॅलन्स जाऊन मोठा अपघात होणार , हा रस्ता महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडल त्यांच्या आधी असून कोणाचा तरी  या खड्डे युक्त रस्त्यामुळे बळी  जाणार  की घेणार  याची  वाट बघत  बसले आहेत  या वरून दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post