गोदरेज आणि बॉईस मँन्यु कंपनीने सामाजिक उत्तर दायित्व जपत खालापूर पोलिसांना दिले आपत्ती व्यवस्थापन साहीत्य



 प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पनवेल सुनील पाटील : 

       खालापूर पोलिस ठाण्यात अनिल विभूते यांची पोलिस निरिक्षकपदी वर्णी लागल्यानंतर विभूते यांनी आपल्या पदाला साजेल अशी कामगिरी करीत सर्वसामान्य नागरिकांच्या मनापासून आपला हक्काची अधिकारी म्हणून ओळख अल्पवधी काळात मिळत असताना पोलिस निरिक्षक विभूतेंनी खालापूर पोलिस ठाणे हद्दीतील कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

        खालापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मुंंबई - पुणे महामार्गावर गेला असून याच हद्दीत पर्यटनाची असंख्य ठिकाणे असल्याने या परिसरात अनेक पर्यटक येत असतात. मात्र महामार्गावर दररोज असंख्य लहान - मोठे अपघात होतात व पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक आनंद घेण्याच्या ओघात काही विपरीत घटना होत असल्याने याठिकाणी उपाययोजना म्हणून पोलिस यंत्रणेला मोठी कसरत करावी असून पोलिस प्रशासनाला मदत म्हणून अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी टीम, सहजसेवा फाऊंडेशन टीम, यशवंती हायकर्स टीम अशा अनेक संस्था - कार्यकर्ते पुढे येत असतात. मात्र ही सर्व मदत होत असताना काही साधन सामुग्री अपुरी पडत असल्याने कोणतीही शोध मोहीम करताना मोठा अडथळा निर्माण होत असून ही समस्या खालापूर पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी ओळखून गोदरेज आणि बॉईस मँन्यु.कं.प्रा.लिमिटेड व्यवस्थापनाशी चर्चा करताच गोदरेज कंपनी आपल्या सीएसआर फंडाच्या माध्यमातुन आपत्ती व्यवस्थापन किट देत ही किट कंपनी व्यवस्थापनाने 6 अॉक्टोबर रोजी खालापूर पोलिसांच्या स्वाधिन तहसिलदार आयुब तांबोली, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, गोदरेजचे व्यवस्थापक राजेंद्र पाशिलकर, तानाजी चव्हाण अनंता दळवी यांच्या हस्ते केले.

     खालापूर तालुक्यातील गोदरेज आणि बॉईस मँन्यु.कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही कारखानदारी करीत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत असल्याने या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात मिळत असतो. कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून असंख्य लोकहिताचे उपक्रम असताना खालापूर पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी पुढाकार घेऊन गोदरेज आणि बॉईस मँन्यु.कं.प्रा.लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तर दायित्व (CSR) उपक्रमा अंतर्गत खालापूर पोलिस ठाणे व अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या सौजन्यातून खालापूर पोलिस ठाण्याला आपत्ती व्यवस्थापन साहीत्य मिळाल्याने खालापूर तालुक्यातील सर्व स्तरावरून गोदरेज कंपनीच्या स्त्युत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

      यामध्ये बोट, दुर्बीण, ग्रो प्रो कँमेरा, सुरक्षा जँकेट, हार्नेस, स्ट्रेचर, स्कँनर एलईडी सर्च टॉच आदी साहित्य गोदरेज कंपनीने खालापूर पोलिसांना दिले असता खालापूर पोलिसांना तात्काळ यातील काही साहित्य हे अपघातग्रस्त टिमकडे सुपुर्द केल्याचे पाहायला मिळाले.

        याप्रसंगी तहसिलदार आयुब तांबोली, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, गोदरेजचे व्यवस्थापक राजेंद्र पाशिलकर, तानाजी चव्हाण अनंता दळवी,  अनुभव ट्रस्ट अध्यक्ष दिलीप आखाडे, उप पोलिस निरिक्षक बजरंग राजपूत, सहाय्यक पोलिस निरिक्षक शेखर लव्हे, गणेश कराड, सामाजिक कार्यकर्ते जितू सकपाळ, अनिल मरागजे, अशोक मरागजे, अपघातग्रस्त टिमचे गुरुनाथ साठीलकर, विजय भोसले, राजेश पारठे, अमोल कदम, हनिफ कर्जीकर,  सहससेवा फाऊंडेशनचे शेखर जांभळे आदीप्रमुखासह पोलिस पाटील, सामाजिक - राजकीय नेते व पत्रकार मंडळी उपस्थित होते.

चौकट - 

     आपत्ती काळात मदत करण्यासाठी अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी टीम, सहजसेवा फाऊंडेशन टीम, यशवंती हायकर्स टीम कशाचीही गरज लागल्या ती मदत करण्यास आम्ही तत्पर असू जेणे करून आपत्ती ग्रस्तांना तात्काळ मदत होईल. तसेच गोदरेज कंपनीने सामाजिक उत्तर दायित्व जपत केलेली मदत ही खरोखर उल्लेखनीय आहे.

आयुब तांबोली (तहसिलदार खालापूर) 



चौकट -

      आमच्या कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून खालापूर पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन साहीत्य वाटप केल्याने या साहित्याच्या वापरातून आपत्ती काळात मदतीसाठी मोठा फायदा होईल, तसेच कंपनी या ही पुढे अशीच सामाजिक कार्य करण्यास तत्पर असेल.

राजेंद्र पाशिलकर (व्यवस्थापक गोदरेज)

Post a Comment

Previous Post Next Post