विशेष वृत्त : खालापूर नगरपंचायत कडून रस्ता दुरुस्तीसाठी एनओसी देण्यास टाळटाळ.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील : 

खालापूर मध्ये भारत पेट्रोल पंप असून तो रस्ता आहे स्वतः खासगी भारत पेट्रोलियम कंपनीचा . त्या रस्त्याची इतकी बिकट व दुरावस्था झालेली असून त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्डेयुक्त रस्त्यावरून वाहने अवजड वाहने पेट्रोल डिझेलचे टँकर ये जा करत असतात, त्या अपघात होण्याचीही शक्यता आहे . त्यानी त्याची एनओसी साठी नगरपंचायत कडे अर्ज केला आहे परंतु त्यांना अद्याप एनओसी दिकेली नाही , एनओसी अद्याप का देण्यात आला नाही ?  याचे  खरे कारण गुलदस्त्यात आहे . 

नगरपंचायत कडून एन ओ सी मिळाल्यानंतरच पुढील कॉन्टॅक्टर नेमण्यात येईल असे भारत पेट्रोलियम पंपाचे मॅनेजर यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहीत दिली.  आता एन ओ सी कधी मिळेल  व ती एन ओ सी एम एस आर टी सी पुणे यांना सबमिट कधी व  रस्त्याचे काम कधी होईल ? या चिंतेतच मी आहे  असे पोटतिडकीने  व कळकळीने  मॅनेजरनी  सांगितले.           

Post a Comment

Previous Post Next Post