ब्रेकींग न्युज : खालापूर तालुक्यामधील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जोरदार पाठपुरावा सुरु , लवकरात लवकर कामे मार्गी लागतील..आमदार महेंद्र थोरवें.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील

   खालापूर तालुक्यातील बहुतांशी खेडे पाड्यासह वाडी वस्तीला जोडणारे मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. ग्रामस्थासह वाहन चालक प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करित आहेत. कर्जत - खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवेंनी वाहन चालक आणि प्रवासी वर्गाची समस्या जाणून काही प्रलंबित रस्त्याची कामे मार्गी लावली असतानाच जांभीवली ते गारमाळवाडी रस्ता, उमरोली मार्गे उजळोली - करंबेळी ठाकूरवाडी रस्ता तसेच खानाव मार्गे खांबेवाडी - उंबरे रस्ता (पूल) तयार करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विशेष पाठपुरावा करत असल्याने आमदार थोरवेंच्या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत असून ही कामे लवकरात लवकर मार्गी लागतील असे मत आमदार महेंद्र थोरवेंनी व्यक्त केले.

         कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दोन वर्षाच्या अल्पवधी काळात जवळपास 300 कोटीची कामे मंजूर करून विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणल्याचे चित्र पाहायला मिळत असून खालापूर तालुक्यामधील ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार थोरवे प्रयत्न करित असल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जांभीवली ते गारमाळवाडी रस्ता तयार करणे - 3 कि.मी, उमरोली मार्गे उजळोली - करंबेळी ठाकूरवाडी रस्ता तयार करणे - 5.500 कि.मी, खानाव मार्गे खांबेवाडी - उंबरे रस्ता (पूल) तयार करणे  - 3 कि.मी पाठपुरावा करीत आहेत, तर या संदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे निधी उपलब्ध करण्यासाठी मागणी केल्याने आमदार थोरवेच्या कामगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   

चौकट- --------------------------------------------------------

    खालापूर तालुक्यातील काही बहुतांशी रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने त्याची मला वेळोवेळी माहिती मिळत असल्याने त्या - त्या रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी व मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करीत असून जसजसी निधी उपलब्ध होईल तसतसी विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन.

 महेंद्र थोरवे (आमदार)


चौकट ----------------------------------------------------

       खालापूर तालुक्यातील दुर्लक्षित रस्त्याची माहीती आमदार महेंद्र थोरवे साहेबांनकडे सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी मंडळीनी पोहचवली असून लवकरच दुर्लक्षित रस्ते चकाचक आमदार साहेबांनच्या पाठपुराव्याने होतील.

संतोष विचारे (शिवसेना तालुकाप्रमुख)


चौकट ---------------------------------------------------------

     माझ्या वार्डमधील समस्या आमदार महेंद्र थोरवे साहेबकडे मांडल्या असून समस्येकडे आमदार साहेबांनी गांभीर्याने दखल घेत लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

उत्तम परबळकर (पं.स.सदस्य खालापूर)

Post a Comment

Previous Post Next Post