प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
सध्या संपूर्ण जगाला कोविड 19 या आजाराने ग्रासले असून त्यावर उपाय म्हणून लसीकरण सुरु आहे. उरण तालुक्यातील १५० दिव्यांगाना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पूर्ण होऊन ८४ दिवस पूर्ण झाले होते त्यामुळे त्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक होते. दिव्यांग बांधवांच्या संघटनेने सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार व सामाजिक कार्यकर्ते संदिप म्हात्रे यांच्या मार्फत *मा.आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर* यांच्याकडे सदर डोस उपलब्ध करण्याची मागणी करताच. *म.आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी तात्काळ दखल घेत *मा.जिल्हा आरोग्य अधिकारी* यांना फोन द्वारे तसेच लेखी पत्राद्वारे उरण तालुक्यातील १५० दिव्यांग बांधवांना दिनांक १० ऑक्टोबर पूर्वी लसीचा दुसरा डोस उपलव्ध करून देण्याची मागणी केली.
त्याची तात्काळ दखल घेत दिव्यांग बांधवासाठी *जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या प्रयत्नांनी ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष लसीकरणाची व्यवस्था आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृह, तेलीपाडा, मुळेखंड,उरण येथे करण्यात आलेली आहे.