उरण तालुका विधीसेल अध्यक्षपदी मच्छिंद्रनाथ घरत यांची नियुक्ती


आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल : सुनील पाटील :

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे  पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख मा.श्रीआदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार  रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुका विधीसेलच अध्यक्ष पदी मच्छिंद्रनाथ घरत यांची नियुक्ती जाहीर केली.

आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. अशा शुभेच्छा  माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सोबत उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळककर, विधानसभासंपर्कप्रमुख महादेव घरत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील, व्यापारी असो.अध्यक्ष द्रोणागिरी नोड रविंद पाटील, उपशहरप्रमुख प्रतिक पाटील, गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते मणिराम पाटील, रघुनाथ पाटील, नरेश म्हात्रे उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post