पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्था संस्थेस भाडेतत्वावर देण्यास महासभेत मंजुरी.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रितम म्हात्रे..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्थेस भाडेतत्वावर देण्यास महासभेत मंजुरी देण्यात आलेली आहे. याबाबत पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी याबाबत सातत्याने पाठपुरावा ठेवणारे आमदार बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांचे तसेच प्रशासन तसेच सभागृहाचे देखील आभार मानले आहेत.
पनवेल महानगरपालिकेची स्थापना दिनांक १ ओक्टोबर २०१६ रोजी झाली. त्यामध्ये पूर्वाश्रमीचे नगरपरिषदचे क्षेत्र समाविष्ट केले आहे. पुर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषद हद्दीतील अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) हा मंजूर विकास योजनेत व मंजूर नगररचना योजनेत प्रायमरी स्कूल व प्ले ग्राऊंड साठी आरक्षित आहे. सदर भूखंडाचे क्षेत्र ७१८८ चौ.मी. नगररचना योजनेनुसार आहे. पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषदेची नगररचना योजना ही शासनाने दिनांक ३१ ऑगस्ट २००९ अन्वये मंजूर केली आहे. त्याचे अभिलेख (योजनेचे नकाशे व फॉर्म १) हे सन २०१६ रोजी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार अभिलेख म्हणजेच भूखंडाचे मालमत्ता पत्रक व नकाशे करणेस उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल यांना त्याच वेळी देण्यात आले आहेत. अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) या भूखंडाची मोजणी संबंधित विभागाकडून दिनांक १६ मार्च २०२१ रोजी झाली आहे. त्यानुसार त्याचे मालमत्ता पत्रक व भूखंडाचा नकाशा संबंधित विभागाकडून प्राप्त होणार आहे. तसेच सदर भूखंड हा महानगरपालिकेस महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ८८ अन्वये ताब्यात आलेला आहे. सदर भूखंडात महानगरपालिके मार्फत भूखंडाच्या काही भागात जलकुंभ उभारण्यात आलेला आहे. त्याचे क्षेत्र १२०० चौ.मी. आहे. भूखंड नकाशात दर्शविल्यानुसार स्वतंत्र ठेवण्यात यावा
महानगरपालिकेच्या मालकीचे पनवेल येथील अं.भु.क्र.२७३ ही जागा रयत शिक्षण संस्था संस्थेस भाडेतत्वावर देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा ठेवणारे आमदार बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यानी विशेष प्रयत्न केले. अंतिम भूखंड क्रमांक २७३ (पार्ट) चे क्षेत्र ७१८८ चौ.मी. आहे त्यातील त्यावेळी मूळ भूखंडाचे ९०० चौ.मी. क्षेत्र ताब्यात होते. ते क्षेत्र रयत शिक्षण संस्थेस देणेबाबत पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ७३२ हा तत्कालीन नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०८ नोव्हेंबर २००४ अन्वये देण्यास मान्यता दिली आहे. व उर्वरित क्षेत्रही ताब्यात आल्यावर देण्यास मान्यता दिली आहे. तरी सदर भूखंडाचे ताब्यात असलेले ९०० चौ.मी. क्षेत्र हे नाममात्र भाडयाने देण्यास हरकत नाही.असे पालिकेने म्हटले आहे.
तत्कालीन नगरपरिषदेचे अध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली २००४ साली झालेल्या नगरपरिषदेच्या सभेत अं.भु.क्र.२७३ मधील ताब्यात असणारे ९०० चौ.मी जागा भाडेपट्यावर देऊन उर्वरित जागा ताब्यात आल्यावर देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. आजच्या सर्वसाधारण सभेत उर्वरित जागा देण्यासंदर्भातला विषय मंजूर करण्यात आला. सातत्याने पाठपुरावा ठेवणाऱ्या आमदार बाळाराम पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब यांचे आभार तसेच त्याबद्दल पालिका आयुक्त, प्रशासन तसेच सभागृहाचे देखील आभार. - प्रितम जनार्दन म्हात्रे,विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका
जे एम म्हात्रे नगराध्यक्ष असताना रयतच्या शालेला जागा देण्यास ठराव करण्यात आला होता. त्याला आज मुहूर्त स्वरूप आलेले आहे जागेसाठी जी टाँगती तलवार होती ती निघून गेली. त्याचे श्रेय आमदार बाळाराम पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब याना जाते. रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी म्हणुन आज ठराव पास करण्यात आला. शालेच्या उत्तर दायित्वतुन मुक्त झालो – गणेश कडु- नगरसेवक, शेकाप