गव्हाण-नवीन शेवा-डोंगरी-डाऊरनगर येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल : सुनील पाटील :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना महामारीत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य विषयक कार्य रक्तदान शिबिरे तसेच सध्या आमदार नसताना देखील आपल्या महाविकासआघडी सरकारच्या माध्यमातून संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचा सपाटा लावला आहे.
मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या आशा विविध कार्याने प्रभावित होऊन रविवार दिनांक ०३ ऑक्टोबर २०२१ रोजी *जेष्ठ कार्यकर्ते धनाजी भोईर* यांच्या प्रयत्नाने नवीन शेवा-गव्हाण-डोंगरी-डाऊरनगर गावतील कार्यकर्त्यानी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत भगवा ध्वज खांद्यावर घेतला. यामध्ये प्रेमा सुरेश भोईर, जितेश सुरेश भोईर, रोणित सुरेश भोईर, जयशंकर गंगाराम भोईर, अर्चना जयशंकर भोईर, मिताली जयशंकर भोईर, प्रणव जयशंकर भोईर, मंगेश दत्ताराम घरत, मयुरी मंगेश घरत यांनी आपल्या कुटूंबियांसहित शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांना *शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी भगवी शाल अर्पण करून व शिवबंधन बांधून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, पनवेल तालुका युवासेना अधिकारी गौरव म्हात्रे उपस्थित होते.