पनवेल सुनील पाटील.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियानातंर्गत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रभाग १९ मधील रास्त भाव धान्य दुकानावर राशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना नगरसेवक अनिल भगत यांच्या मार्फत उत्तम दर्जाच्या पिशवींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक अनिल भगत, भाजपचे शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सचिन पाटील, रोहित आटवणे, चंद्रकांत मंजुळे, आदी उपस्थित होते.
Tags
Panvel