प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील
औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीच्या योगेश पुजारी, दिनेश पवार, प्रीतम मंडलला गोल्ड मेडल, अक्षय शनमुगन, योगेश पुजारी, कृणाल पिंगळे, श्रुती हनुमंत मोरे याना सिल्व्हर मेडल हे सगळे सिनियर ते ज्युनियर शुभम कंगळे याला ब्राँझ मेडल असे वेगवेगळ्या वजनी गटात पटकविण्यात यश प्राप्त झाले आहे.
हे सर्व यशस्वी युवक येत्या काही दिवसात गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रिय आणि त्यानंतर हॉंगकॉंग येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न आणि सराव करत आहेत.खोपोली मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या या युवकांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.