शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.माणिक हिराजी पाटील यांच्या O.N.G.C. सेवानिवृत्ती कार्यक्रमास .आमदार मनोहरशेठ भोईर यांची उपस्थिती*



 प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पनवेल सुनील पाटील :

उरण शहराच्या कोट गावातील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते *श्री.माणिक हिराजी पाटील* हे O.N.G.C. च्या प्रदिर्घ सेवेतून गुरवार ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास *शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार श्री.मनोहरशेठ भोईर* व *नगरपालिकेतील शिवसेना गटनेते श्री.गणेश शिंदे* यांनी उपस्थिती लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी *मा.आमदार मनोहरशेठ भोईर* यांच्या शुभहस्ते *श्री.माणिक पाटील* यांचा सपत्निक सत्कार करून सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील आयुष्यास सुखकारक व निरोगी जाण्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. 

सदर कार्यक्रमास उपशहरप्रमुख अरविंद पाटील, उपशहरप्रमुख कैलास पाटील, शहरसंघटक दिलिप रहाळकर, मा.शहरसंघटक महेश वर्तक, अल्पसंख्यांक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, मिलिंद भोईर, सुशांत तांडेल, गणेश तांबोळी, अमित, शिवसैनिक व पाटील कुटुंबिय उपस्थित  होते.

Post a Comment

Previous Post Next Post