खोपोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण...




प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील :

   

        खोपोली शहरातील बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातुचा पूर्णाकृती पुतळा नगरपरिषदेने उभारला असून पंचधातुच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते सोमवारी 4 आँक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

      याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, तहसिलदार आयुब तांबोली, मुख्याधिकारी अनुप दुरे, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्यासह पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवकांसह खोपोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             तीस वर्षापूर्वापूर्वी बसविलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा मी साक्षिदार असून नव्याने उभारलेल्या पंचधातुच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी दिल्याबद्दल नगराध्यक्षा सुमन औसरमल यांचे नामदार आठवले यांनी प्रथम आभार मानले. जगातील सर्वात जास्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे असतील ते ही लोकवर्णीतून त्यामुळे इतर समाजातही बाबासाहेबांबद्दल भावना आदराची होती असे नामदार आठवले यांनी सांगत खोपोली शहरावर विशेष प्रेम असून महाड चवदार तळ्यावर खोपोलीतून मोठ्या संख्येने धम्मबांधव येत असत. पंचधातुचा पुतळा उभारण्यासाठी नगराध्यक्षा सुमन औसरमल आणि नगरसेवक मोहन औसरमल यांनी केलेली मेहनत कौतुकास्पद असल्याची स्तुती केली.

           सत्ता कोणाचीही असली तर राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच काम करावे लागत असल्यामुळे जगात आपली राज्यघटना पवित्र आहे. त्यामुळे सर्व जातीधर्मांची लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगत पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहता आले याबद्दल आयोजकांचे आभार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. तर आमदार महेंद्र थोरवे व माजी आमदार सुरेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्षा विनिता कांबळे तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्षा सुमन औसरमल आणि स्थानिक नगरसेवक समीर मसुरकर, नगरसेविका केविना गायकवाड यांनी केले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post