रायगड भूषण पुरस्कृत श्री प्रकाश हातमोडे यांची मागणी....
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
आपल्या सर्व आगरी कोळी बांधवांना कळकळीची हात जोडून विनंती करतो की विषय कारला देवी च्या दर्शनाला जाताना जो टोल आकारला जातो त्याविषयी बंधू भावांनो गेले कित्येक वर्ष म्हणजे टोल चालू झाल्यापासून हा विषय मी स्वतः राज ठाकरे कै आनंत तरे कारला विश्वस्त यांच्यापर्यंत ,
निवेदनाद्वारे कळविण्यात प्रयत्न केला .आहे कारळल्यात येणाऱ्या भक्तांना कडून टोल घेऊ नये .फक्त तीन किलोमीटर अंतर असलेल्या ठिकाणी चाळीस रुपये आज तो आकारला जातो .बऱ्याच वेळेला आपल्या आगरी कोळी कराडी बांधवांशी ह्या टोल नाक्यावर जोरदार भांडण हाणामारी पर्यंत गेलेला आहे. टोल कामगार जास्त मंडळी असल्यामुळे आपल्या बांधवांना त्याचा खरोखर अक्षरशा मार खावा लागतो .यासाठी आपण सर्वांनी बंधु भावांनो एकत्र आलो आहोत .कुटुंब या ऐप मधून हजारे बांधव यातून एकत्र आले .आहेत यातून मार्ग सुद्धा निघू शकतो .
या साठी सन्माननीय केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील .व राजू दादा यांच्यापर्यंत हा विषय धसाला लावून वेळ आली तर त्या टोलनाक्यावर जाऊन मार्ग काढावा लागेल .तसेच एकवीरा देवीच्या ठिकाणी जास्त जास्त आगरी कोळी कराडी व पूर्ण मराठी बंधु ही लोकं जाऊन कारळल्यात अर्थव्यवस्थाला ऐंशी टक्के हातभार लावत असतात. तेथील दुकानदार विक्रेते फुलवाले मांसाहारी धंदे यांचा उत्पन्न सुद्धा या समाजाच्या लोकांकडून होतोय . त्यांचा उदरनिर्वाह होतोय अशा भक्तांना कारल्याच्या प्रवास टोल मुक्त झाला पाहिजे .
त्याच्यासाठी पर्याय सुद्धा आपल्याकडे आहेत 1 जर आपण एक्सप्रेस वरून टोल भरून गेलो तर त्या भक्ताला त्या टोलनाक्यावरून सुट मीलाली पाहिजे 2 नाक्यावरून वेगळी मार्गिका ठेवा 3 टोल घ्यायचा असेल तर 10 रुपये घ्या4 हा टोल नाका कारल्या फाट्याच्या पुढे नेन्यात यावा .जेणेकरून त्या सगळ्या समस्या दूर होतील 6 ज्या गाडीला आगरी कोळी स्टीकर असेल त्या गाडीला या टोलनाक्यावरून सूट मिळालीच पाहिजे .मी एका आगरी रायगड भूषण पुरस्कृत श्री प्रकाश शंकर हातमोडे पनवेल गिरवले रायगड याने आगरी कोळी कराठी बांधवांना विनंती केली आहे