रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ चे विजेते मा.श्री.कौशिक ठाकूर सर यांनी घेतेली मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील :

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सारडे, उरण येथे कार्यरत असणारे उपक्रमशील  शिक्षक, आवरे गावचे सुपुत्र सन्माननीय *श्री.कौशिक मधुकर ठाकूर सर* यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग यांच्या वतीने *आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१* हा शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्जत येथे देण्यात आला.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे औचित्य साधून *श्री.कौशिक ठाकूर सर* यांनी आपल्या कुटुंबासहित *मा.आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर* यांची सदिच्छा भेट घेतेली. यावेळी *मा.आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी *श्री.कौशिक ठाकूर सर* यांना मायेची भगवी शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन शुभाआशिर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोबत शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत व शिक्षक सेनेचे महेश गावंड सर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post