प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~
नेरळ- माथेरान घाट रस्त्यात या पावसाळयात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत.त्या दरडी र्सोबत आलेलए दगड आजही रस्त्याच्या कडेला आहेत त्याच स्थितीत असून डोंगरातील अनेक दगड आजही खाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान,हे दगड खाली येऊन अपघात होण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेचे प्राण जाण्याची वाट पाहत आहेत काय? असा सवाल माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी उपस्थित केला आहे.
माथेरान या मुंबईपासून सर्वात जवळ असलेल्या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी सध्या नेरळ-माथेरान घाटरस्ता हा एकमेव मार्ग आहे. पावसाळा सुरु असून या पावसाळयात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून त्या दरडी सोबत आलेले दगड आजही रस्त्याच्या बाजूला आहे त्याच स्थितीत आहेत. त्यात डोंगरात रस्त्याच्या वरच्या बाजूला आणखी काही ठिकाणी घरासारखे आकाराचे दगड खाली येण्याची शक्यता आहे. अशावेळी वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग अपघाताला निमंत्रण देणारे दगड बाजूला करण्याची कार्यवाही बांधकाम विभाग करताना दिसत नाही. याबद्दल माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी बांधकाम विभाग लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे काय असा परष उपस्थित करीत संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावरून तीन ठिकाणी वेगाने पाणी वहात आहे त्यामुळे रस्त्याचं नुकसान होत आहे.जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याचा भाग वाहून जाण्याची शक्यता देखील तयार झाली आहे.त्यावेळी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात गाड्या चालवणे देखील व्हॅनचालक यांनी कठीण होऊन बसले आहे .
तर दुसरीकडे वारंवार दरड कोसळत असून रस्त्यावर मोठी दरड कोसळली आणि रस्ता वाहून गेला तर त्यास कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता जबाबदार राहणार आहे.त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला डोंगरातून वाहत येणारे धबधबे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात,तेथे लहान लहान दुकाने लावून व्यवसाय देखील होतो. मात्र अशा ठिकाणी जर दरड कोसळली तर मात्र अनेकांचे जीव जाऊ शकतात हि बाब वन विभागाने समजून घावी आणि तसे सूचनाफलक लावावेत हि अनेक वेळा केलेली मागणी देखील वन होत नाही असा आरोप नगराध्यक्ष सावंत यांनी केला आहे.माथेरानला सुरक्षित ठेवणे आणि त्याच बरोबर नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणं ही जबाबदारी फार महत्वाची आहे यासाठी आपण यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्याशी केलेल्या पत्र व्यवहार यांची माहिती राज्य सरकारला कलविणार आहोत असे खरमरीत पात्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
अक्षय चौधरी-प्रभारी,उपअभियंता कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग
नेरळ माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात झाल्या आहेत,त्यावेळी डोंगरातून माती सोबत आलेले दगड हे काही प्रमाणात रस्त्यावर तर काही डोंगरात अडकून पडले आहेत.ते दगड खाली आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची गरज आहे.त्यासाठी आम्ही व्हीजेटीआय स संस्थेला पत्र पाठवले आहे.त्यांची टीम येऊन पाहिलं आणि त्यानंतर दगड कसे काढायचे यावर निर्णय घेण्यात येईल.मात्र घाटरस्ता सुरक्षित करण्यावर बांधकाम विभागाच्या भर आहे.