प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
शिवसेना शाखा बालईच्या वतीने बालई गावातील व आसपासच्या परिसरातील नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार श्री.मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख श्री संतोष ठाकूर व शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे* यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत Covaxin व covidshild लसीचे डोस वयोगट अठरा वरील नागरिकांना उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये पहिला व दुसरा डोस यांचा समावेश होता, सदर डोस गुरुवार दिनाकं ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजल्या पासून श्री गणपती मंदिर, बालई, उरण येथे देण्यात आले. शिवसेनेच्या वतीने कोविड लसीकरण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत.
या वेळी बालई गावअध्यक्ष श्रीधर माळी, शिवसेना उपतालुकासंघटक अमित भगत, शहरप्रमुख श्री विनोद म्हात्रे, उपविभागप्रमुख रवि पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, उपशहरप्रमुख श्री गणेश पाटील, मा.नगरसेवक निलेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते अमित ठाकूर, धनेश माळगांवकर, धनराज चव्हाण तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख सुरज मढवी, सुशांत तांडेल, संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हर्षद माळी, चेतन माळी, निलेश पाटील, भगवान पाटील, सुभाष पाटील, निखिल पाटील, भगवान म्हात्रे, प्रकाश मोहिते, निलेश माळी, विक्की पवार, अनुराग पाटील, कल्पेश पाटील व युवा कार्यकर्ते तसेच बालई ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.