प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील सावेळे गावात असलेल्या म्हशींच्या तबेल्यावर काम करणाऱ्या वयोवृद्ध कामगाराचा खून झाला आहे.या घटनेत आणखी एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न मध्यरात्री नंतर आलेल्या चार अज्ञात मारेकऱ्यांनी केला आहे.दरम्यान, या खुनाच्या प्रकरणात कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन संशयित यांच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
कर्जत तालुक्यातील सावेळे गावातील आरिफ हाजीमिया मुल्ला यांचा म्हशीचा तबेला आहे.त्यांच्याकडे गणपत रावजी जाधव हे अनेक वर्षांपासून कामगार म्हणून काम करीत होते.मंगळवार रात्री दीड ते दोन च्या सुमारास त्या तबेल्यावर चार अज्ञात इसम आले आणि त्यांनी तेथे असलेल्या कॉटवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर चादरीने तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.डासांचा त्रास होऊ नये म्हणून अंगावर चादर घेऊन झोपलेलेआरिफ मुल्ला यांची देहयष्टी मजबूत असल्याने त्यांनी तोंड दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींना आपल्या ताकदीने फेकून दिले.
मात्र त्यावेळी आरडाओरडा करीत असलेले 75वर्षीय कामगार गणपत रामजी जाधव यांच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी मारहाण केली.तर अज्ञात इसमांच्या तावडीतून सुटल्यानंतर त्यांच्या डोक्यात त्या अज्ञात इसमांनी लोखंडी हत्यारांनी वार केल्याने आरिफ मुल्ला आणि गणपत जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिले.त्या तबेल्यावर पहाटे साधारण अडीच वाजता आरिफ मुल्ला यांचा मुलगा दूध काढण्यासाठी दररोज येत असतो.सादिक आरिफ मुल्ला हा तबेल्यावर पोहचला असता त्याला त्याचे वडील आरिफ हाजीमिया मुल्ला आणि कामगार गणपत रामजी जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले.
पहाटे तीन वाजल्यापासून सादिक मुल्ला याने कर्जत पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न केला,मात्र कर्जत पोलीस ठाण्याचा बीएसएनएलचा फोन बंद असल्याने सव्वा चार वाजता एका पोलिसांचा मोबाईल फोन वरून या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना दिली.त्यानंतर चार वाजून 20 मिनिटांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुवर्णा पत्की या आपल्या स्टाफ सह सावेळे गावात पोहचल्या. तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचार करण्यासाठी आणले असता 75 वर्षीय गणपत रामजी जाधव यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.तर दुसरा जखमी व्यक्ती आरिफ मुल्ला यांच्यावर उपचार सुरू केले.
या घटनेची माहिती होताच शेकडो लोक कर्जत पोलीस ठाण्यात जमले होते,घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलोस अधीक्षक अशोक दुधे यांनी पहाटेच माहिती घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना कर्जत येथे पाठवले.त्यानंतर सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे,कर्जतच्या पोलीस निरीक्षक पत्की यांनी घटनेचा तपास सुरू केला.त्यावेळी पोलिसांनी अलिबाग येथून डॉग स्कोड देखील बोलावून घेतला आणि अज्ञात इसमांनी गणपत जाधव यांच्या खून केल्यानंतर काही धागेदोरे सोडले आहेत काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.कर्जत पोलीस ठाण्यात जखमी आरिफ मुल्ला यांच्या फिर्यादीनंतर गणपत रामजी जाधव यांच्या खून अज्ञात इसमांनी केला असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या खून प्रकरणाचा तपास करीत आहेत.