सदरचा साकावा आम्ही आमच्या सोयीसाठी केला - शासनाने नाही जमीन मालकांचा खुलासा.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
खालापूर तालुक्यातील गोरठण बुद्रुक, वावोशी या गावातील 2 साकव हे जीर्ण स्थितीत असल्याने जिल्हा परिषदेकडून सदर गावांना जोडणारे साकव बांधण्यासाठी सन 2019 रोजी रायगड जिल्हा परिषदेकडून 30 लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र आजपर्यंत अनेकवेळा पत्रव्यवहार करून देखील सदर साकवांचे काम न झाल्याने ग्रामस्थांचा प्रवास तुटलेल्या साकावा वरून जीव मुठीत घेऊन सुरू आहे, अशी कैफियत मांडल्यानंतर हा साकव असणारी जागा खाजगी असल्याने येथील जमीन मालक यांनी हा साकावा शासनाचा नसून आम्ही आमच्या जाण्या येण्याकरिता तयार केला आहे. याबाबत 2012 साली बांधकाम करण्यासठी आलेल्या अधिकारी वर्गाला यावर स्थिगीत घेतल्याचे पत्र दाखविले आहे, तर या भागात राहणाऱ्या नागरिकांना वावोशी भागातून शासनाचा रस्ता असल्याने आमच्या खाजगी जाग्यावर बांधकाम करून आमच्या जमिनीची हानी करू नये अशी माहिती येथील जमीन मालकाने दिली आहे.
खालापूर तालुक्यातील वावोशी गोरठण बुद्रुक येथील ग्राम पंचयत हद्दीत तीन वाड्या आणि एक धनगरवाडी असे चार गावांचा संपर्क येणाऱ्या वाड्या वस्त्याचा समावेश असल्याने या ठिकाणी जाण्यायेण्या साठी मध्ये मोठा नाला असल्याने यावर अनेक वर्षांपूर्वी साकव बांधण्यात आला आहे. मात्र हा लोखंडी साकव पूर्ण जीर्ण झाला असून जीव धोक्यात घालून या ठिकाणी जवळपास 250 हुन अधिक नागरिक यात लहान शाळकरी मुले, कामगार, महिला, ग्रामस्थ या नादुरुस्त साकवावरून जीव मुठीत धरून 12 ही महिने प्रवास करीत असतात अशी माहिती येथील सरपंच विक्रांत पाटील व नागरिकांनी दिली होती. या ठिकाणी शासनाकडून निधी ही मिळाला आहे मात्र कामास आडकाठी येत असल्याचे सांगितल्यानंतर याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच येथील जमीन मालक अनिल पाटील, सखाराम लखीमले व हरेश यादव यांनी ही जमीन आमच्या मालकीची आहे सातबाऱ्यावर आमची नोंद आहे. तसेच सदरचा वस्ती असलेला भाग हा गोरठणमध्ये नसून वावोशी ग्राम पंचयत हद्दीत येत आहे. व त्या भागातून या नागरिकांना शासनाचा रस्ता आहे, गोरठण भागातून असणारा साकावा हा आम्ही आमच्या सोयी साठी बांधला आहे. आणि तो शासनाच्या खर्चातून नव्हे आम्ही आमच्या खर्चातून बांधला आहे. शासनाचा निधी मंजूर करताना बाजूला असणाऱ्या विहिरीच्या पलीकडून मंजुरी घेतली होती परंतु बांधकामासाठी खोटे कागद पत्र बनवून आमच्या जागेत बांधकाम करण्याचा प्रयत्न 2012 मध्ये झाला होता. त्यामुळे आम्ही यावर स्थगिती मिळवली होती.
त्यामुळे हे काम थांबले असल्याने आता पुन्हा या ठिकाणी दिशाभूल करून काम करण्यासाठी प्रयत्न होत आहे, तरी याबाबत सदरच्या जमिनीची माहिती घेऊन कार्यवाही करावी व आमच्या जमिनीत काही लोकांच्या स्वार्थासाठी का करून जमिन बळकावून बांधकाम करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा जमीन मालक अनिल पाटील, सखाराम लखिमले, हरेश यादव यांनी दिला आहे.