प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल : सुनील पाटील :
नेरळ शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने आयोजित कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला नेरळकर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या शिबिरात तब्बल ४९८ जणांचे लसीकरण करण्यात आले
नेरळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना शाखा कार्यालयात कोविड १९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे व उपशहरप्रमुख बंडू क्षीरसागर व शहर संपर्कप्रमुख किसन शिंदे माजी तालुका प्रमुख भगवान चव्हाण जेष्ठ शिवसैनिक चिंधू बाबरे सुनील राणे सुरेश राणे ग्रामपंचायत सदस्य शारदा सालेकर पार्वती पवार नितीन निर्गुडा नेरळ व्यापारी फेडरेशन अध्यक्ष कमलेश ठक्कर आदी उपस्थित होते नागारिकांच्या नावाची नोंदणी करण्याचे काम युवासेनेने केले नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ दीपमाला शिंदे यांच्या अधिपत्याखाली आरोग्यसेविका नगरखळे आणि घोडके यांनी नागरिकांचे कोविड लसीकरण करून घेतले पहिला आणि दुसरा डोस असे एकुण ४९८ जणांनी लसीकरण करून घेतले.आम्हाला दर दोन दिवसाने हा कार्यक्रम दिले तरी चालेल कोविड लसीकरण करून घेऊ