नवरात्र - अभिनव सामाजिक विकास मंडळ गुळसुंदे
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटोल
नवी मुंबई बंगाली असोसिएशनच्या ४२ व्या दुर्गोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. १९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान वाशी, सेक्टर ६ येथे पारंपारिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा करून उत्सवाला सुरुवात झाली. गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही कोरोना नियमांचे पालन करत सकाळ व संध्याकाळ आरती व अन्य धार्मिकविधी पार पडणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या दुर्गा महोत्सवाचे दृश्यप्रणालीच्या माध्यमातून स्थानिक आणि थेट कोलकात्ता येथून प्रसारित होणाऱ्या देवी दर्शन, सांस्कृतिक व लोकसंगीत जागराची ट्रस्टने भक्तांसाठी घरबसल्या व्यवस्था केली आहे.
Tags
पनवेल