प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल : सुनील पाटील :
यापूर्वी पंचायतीतील पूर्व सदस्यांनी २००७/८ ला सोमटणे गावची शासकीय जमीन बेकायदेशीर रित्या अपोलो लॉजिस्टिक कंपनीला कवडीच्या भावात विकण्यासाठी पुढाकार घेतला,आणि आज डम्पिंग ग्राउंड साठी जागा शोधण्याची वेळ येऊन असमर्थाता दाखवली जाते..त्यामुळे पंचायतीच्या पूर्व सदस्यांच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांना, आता दैनंदिन कचरा टाकण्यासाठी कुठेच पर्याय राहिला नसल्याने कोकण रेल्वेच्या मोकळ्या जागेचा डम्पिंग ग्राउंड म्हणून बेकायदेशीर वापर करायला लागला आणि त्यामुळे आता कोकण रेल्वे ने सुद्धा सदर जागी कचरा टाकण्यास मनाई चे बोर्ड लावून प्रत्येक घरी रेल्वे पोलीस यांना पाठवून ग्रामस्थांनावर यापुढे कचरा रेल्वेच्या मोकळ्या जागेत टाकल्यास त्यांना जेल मध्ये टाकण्याची समज दिली गेली.त्यामुळे सदर विषयाला कारणीभूत पंचायतीचे आजी माजी सदस्य,व शासकीय अधिकारी,या सदस्य व शासकीय अधिकारी यांना सत्तेची खुर्ची मिळाल्यावर लगेचच सत्तेच्या खुर्चीची हवा मेंदूत शिरते. त्यात सदस्य व अधिकारी पदाचा दोष नाही.सत्ता व अधिकार पद मिळाल्यावर सर्वच सदस्य व अधिकारी यांच्या मेंदूची जागा बदलून मेंदू गुढग्यात वाढतो.त्यामुळे सदस्याचा व शासकीय अधिकाऱ्याचा मेंदू आहे त्या जागेवर आण्यासाठी, एकच जालीम उपाय म्हणजे ग्रामस्थांनी आपल्या घरातील दैनंदिन कचरा वार्डातील सदस्य व अधिकारी यांच्या घरात नेऊन टाकणे.आणि यासाठी खरोखर सर्व ग्रामस्थानी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि घेतील .
तरी मा. विस्तार अधिकारी अविनाश घरत साहेबाना विनंती आहे की आपण चौकशी अधिकारी आहात या नात्याने सदर विषयात मा ग्रामसेविका व विद्यमान सदस्यावर गलथान कारभाराविषयीं कारवाई करून एक महिन्यात उघड्यावरील कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा मार्ग शोधला नाही तर ग्रामस्थाना घेऊन ग्रामसेविका, सोमाटणे ग्रुपग्रामपंचायतीचे सदस्य,जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समितीचे आपल्या सहित सर्व अधिकारी यांच्या घरात सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीतील सर्व घरांचा दैनंदिन कचरा टाकण्याची तयारीत असेन.