प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
नवरात्रौत्सवानिमित्त उलवा नोड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले.
जय बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (कोपर), रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व तामिळ संघम सेक्टर १९, लांगेश्वर मित्र मंडळ मोरावे आणि व्यापारी एकता मित्र मंडळ मोरावे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आयोजकांच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोळी समाजाचे नेते उत्तम कोळी, युवा नेते मदन पाटील, निलेश खारकर, नितेश म्हात्रे, विशाल म्हात्रे, राजू खारकर, शैलेश भगत, अनुसया घरत, प्रिया अडसुळे, आरती तिवारी, प्रियांका शिंदे, कृष्णा सगादेवन, शेखर नडार, शिवकुमार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.