प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल: सुनील पाटील :
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून, भाजप रायगड जिल्ह्याच्या वतीने पर्यावरण विषयी संगम, वाटिका, पर्यावरण चित्रकला, झाडासोबत सेल्फी अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत पर्यावरण या विषयावर लहान गट (इयत्ता ५ वी ते ८ वी), मोठा गट (९ वी ते १२ वी) या गटातील विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धत लहान गट व मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक २००० रुपये, प्रोत्साहनपर पारितोषिक प्रत्येकी ४ विद्यार्थीसाठी ११०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पाच विद्यार्थ्यांना ५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण रक्षक पंधरवडा अभियानाच्या प्रदेश संयोजिका ऍड. माधवीताई नाईक (उपाध्यक्षा भाजप महाराष्ट्र ), सहसंयोजक प्रवीण अलई, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते यांनी केले आहे.
स्पर्धत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://forms.gle/FHivTUnoTwtQDLmx8 या लिंक वर जाऊन गुगल फार्म भरावा.तसेच चित्रकला स्पर्धत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी A-4 साईज कार्ड शिट वर रंगवलेले चित्रे दिनांक २० आक्टोंबर २०२१ पर्यंत स्थानिक भाजप कार्यालय येथे जमा करावेत. तसेच अधिक माहितीकरिता बिना गोगरी (८३६९३६५३५२), श्वेता ताडफळे (७३७८५८६५८७) यांच्याशी संपर्क साधावा