पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते हायमास्ट दिव्याचे लोकार्पण.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल : सुनील पाटील :

पनवेल नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पनवेल महापालिका आणि भारतीय जनता पार्टी तत्परतेने कार्य करत राहणार असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे  सभागृहनेते परेश ठाकूर यांनी खारघर येथे हायमास्ट दिव्यांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले. खारघर येथील सेलीब्रेशन हाऊसींग सोसायटीमध्ये नगरसेवक निलेश बावीस्कर यांच्या नगरसेवक निधीमधून हायमास्ट दिवे बसविण्यात आले असून, या दिव्यांचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते  लोकार्पण करण्यात आले.

पनवेल महापालिकेमार्फत सिडकोकडून हस्तांतरीत करण्यात आलेल्या विविध सेवा नागरीकांना देण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यानुसार खारघर येथील सेलीब्रेशन सोसायटीमध्ये पनवेल महापालिकेचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या नगरसेवक निधीमधून हाय मास्ट दिवे बसविण्यात आले आहे. या दिव्यांचे लोकार्पण सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते संपन्न झाले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रविण पाटील, निलेश बाविस्कर, भाजप युवामोर्चाचे समीर कदम, वॉर्ड अध्यक्ष आनंद मोकाशी, मोहन भुजबळ, मीडिया सेलचे उपाध्यक्ष कंचन बिर्ला सिंग, सेलिब्रेशन सोसायटीचे अध्यक्ष काटकर, सचिव श्री. चव्हाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post