एका फोन ने लसीकरण टीम आपल्या दारी--
शिवसेनेची समाजसेवा आता घरो-घरी...
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझे कुटुंब-माझी जबाबदारी* ही संकल्पना दिली, हया संकल्पनेचा आदर करत शिवसेना उरण शहर शाखे तर्फे फिरता मोफत लसीकरण कार्यक्रम जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे सुरू करण्यात आला आहे. उरण शहराच्या प्रत्येक विभागात/प्रभागात/वार्डात सर्व नागरिकांनासाठी *एका फोन ने लसीकरण टीम आपल्या दारी--शिवसेनेची समाजसेवा आपल्या घरो-घरी या टॅग लाईन खाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनाकं 11 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आला.
या मोफत फिरता लसीकरण कार्यक्रम संपूर्ण उरण शहरात राबविण्यात येणार आहे, या मध्ये covidshild व covaxin लसीचे पहिला व दुसरा डोस उपलब्ध करण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी मोबाइल व्हॅन वर दिलेल्या पदाधिकारी यांना फोन करून आपल्या साठी घरपोच लसीकरण संधीचा फायदा लाभ घ्यावा असे आहावन आयोजक *शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी केले.
या वेळी उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर ,शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे, शहर संपर्क प्रमुख श्री गणेश म्हात्रे,शहरप्रमुख श्री विनोद म्हात्रे,नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी, उपशहरप्रमुख गणेश पाटील, अरविंद पाटील, मा नगराध्यक्ष परमानंद कारगुटकर, उपतालुका संघटक अमित भगत, युवासेना शहरप्रमुख नयन भोईर, संदीप जाधव, धीरज बुंदे, चेतन म्हात्रे, एजाज मुकादम, रफिक मुल्ला, शादाब, महेश वर्तक, प्रवीण मुकादम, संदीप जाधव, रवी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.