प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल : सुनील पाटील :
कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्टेशन परिसरातील डिकसळ गारपोली कोषाणे वावे या परिसरातील रेल्वेलाईनला लागून असलेल्या जमिनीवर मध्य रेल्वेचे हे प्रस्तावित कारशेड होत असल्याने येथे होणाऱ्या रेल्वे कारशेड मध्ये बाधित स्थानिक शेतकरी भुमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावे अन्यथा आम्ही संघर्ष करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनला दिला आहे तीन दिवसापुर्वी या सदर्भात सव्हे झाल्याची माहिती समोर आली असून दवाखान्यात आसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील अशाही परिस्थिती शेतकरी च्या प्रश्न मांडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने या विभागातील शेतकऱ्याकडून जितेंद्र पाटीलचे कौतुक होत आहे
भिवपुरी स्टेशन लगत ज्या शेतकरी बाधित होत आहे शेतकऱ्यांना पैशाचा मोबदला देऊन भुमिहिन करणारे किती तरी योजना येऊन गेल्या परंतु योग्य मोबदला आणि प्रकल्पात नोकरी यासाठी कोणीही आवाज उठवला नाही परंतु मा.राज ठाकरे साहेबांचा वरदहस्त असलेल्या मनसेचे जिल्हा प्रमुख व रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी प्रस्तावित कारशेडच्या निमित्ताने जमिनीच्या योग्य मोबदला आणि रेल्वेत नोकरी आसा प्रस्ताव रेल्वे अधिकारच्या समोर ठेवले आहे स्थानिक शेतकरी वर्ग त्यांच्या ठामपणे उभे आहे जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील यांचे माध्यमातून एक प्रभावी नेतृत्व लाभले असुन मनसेनी अशी भूमिका घेतल्यामुळे तालुक्यात शेतकरी वर्गाला अच्छे दिवस बघायला मिळणार