मोहपाडा वासंबे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य , ग्रामपंचायत माञ या कडे पुर्ण दुर्लक्ष


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील 

मोहोपाडा वासंबे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत चाललेले कचऱ्याचे साम्राज्य त्यात  कोरोना आजारा मुळे  त्रस्त झालेले नागरिक त्यात स्वास घेतांना सुद्धा दुर्गंधी या मूळे जीव नकोसा झालेला आहे ,   येथील मुख्य रस्त्यावरच  घाणीचे  व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असून ग्रामपंचायत माञ या कडे पुर्ण दुर्लक्ष करीत आहे .

कचरा उचलण्यास ग्रामपंचायत कडे अपुरी सामुग्री आहे का ? काय त्यांना वेळ मिळत नाही.?  झाडे लावा झाडे जगवा अशी ग्रामपंचायत फतवा काढते कचरा कचरा कुंडीत टाका पाणी उकळून प्या या गोष्टी फक्त कागदावरच आहेत कृती काहीही नाही . ग्रामपंचायतला  जनतेच्या आरोग्याशी काही देणे घेणे दिसत नाही.  मोहोपाडा जनता विद्यालय कडे जाणारा रस्ता तेथून मुलांची शाळेची  सतत रहदारी असते त्या मुख्य कॉर्नरला अशा प्रकारे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असून जाता- येताना किळस वाटते .

तसेच अचानक मैदान म्हणून फेमस असलेल्या मच्छी मार्केट  लगत जाणारा  रस्ता या रस्त्यालगतच झालेले घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसते.  आजूबाजूला बिल्डिंग,  घरे आहेत तेथील नागरिकांना त्रास होत नसेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे एवढी घाण बघून गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे . सदर ही बाब खालापूर पंचायत समिती चे बीडीओ त्यांनी जातीने लक्ष टाकून येथील कचरा मुक्त करून  नागरिकांना आपले आरोग्य निरोगी  ठेवण्यास मदत करावी.

Post a Comment

Previous Post Next Post