प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
नेरळ गावातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. नेरळ मोहाचीवाडी भागातील 300 लोकांनी लसीकरण करून घेत शिबीर यशस्वी केले.
नेरळ मोहचीवाडी येथील शनी मंदिर सभागृहात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन येथील गुरुचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले होते.तालुक्यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने कोविशिल्ड लसीकरण करून घेतले. त्यात आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ गौरव बावणे यांच्यासह आरोग्यसेविका सुनीता चौरे,अनिता पुसा,पर्यवेक्षक भारती भोईर आशा सेविका जयश्री निंबाळकर यांनी लसीकरण करून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी 200जणांना कोवीशिल्ड पहिला आणि 100जणांना दुसरा डोस देण्यात आला. गुरुचैतन्य बहूउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वर्षा बोराडे यांच्या पुढाकाराने आयोजित झालेले शिबीर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष कैलाश खांगटे,सचिव लीना मोरे तसेच संस्थेचे संजय भागवत,सिराज शेख,ज्ञानेश्वर भगत,वंदना भालेराव,चैतन्य बोराडे यांनी पुढाकार घेतला. या शिबिराला भाजप कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे,चिंचवली ग्रामपंचायत च्या सदस्य सुप्रिया भगत यांनी भेट दिली.
नेरळ गावातील खांडा भागात जय हनुमान मित्र मंडळ आणि विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्या माध्यमातून लसीकरण शिबीर आयोजित केले होते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शिबिराला कोविशील्ड लसीचा पहिला डोस 280 जणांनी तर 100 जणांनी दुसरा डोस घेतला. त्याचवेळी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील जुम्मापट्टी येथे नेरळ ग्रामपंचायत च्या सरपंच उषा पारधी आणि सदस्य मंगेश म्हसकर यांच्या माध्यमातून लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 150 पहिला डोस आणि 50 जणांना दुसरा डोस देण्यात आला. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने हे लसीकरण करून घेण्यात आले.