माथेरान येथील लुईझा पॉईंट ठरतोय धोकादायक अखेर मनमोकळे फिरण्यास आलेल्या तरुणाचा मृतदेह दरीत सापडला





प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटी

      माथेरान मधून रविवार दि.२६ रोजी  बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह माथेरान मधील लुईझा पॉईंटच्या डाव्या बाजूच्या दरीत सापडला.

        मुंबई-पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान मध्ये शनिवारी दि.२४ रोजी मुंबई येथील १८ वर्षीय तरुण हा फिरण्यासाठी माथेरान येथे आला होता.रविवार दि.२६ रोजी सकाळी फिरण्यासाठी गेला तो माथेरान येथून बेपत्ता झाला.माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची शोध मोहीम सुरू झाली.सोमवारी दि.२७ रोजी संपूर्ण दिवस शोध मोहीम सुरू होती.ड्रोन कॅमेरे याची मदत ही घेण्यात आली.परंतु डोंगर-दऱ्यातून वाढलेले गवत आणि पावसाळी असलेले दाट धुके यामुळे त्याचा ठावठिकाणा काही लागला नाही.

             शनिवार दि.२ रोजी लुईझा पॉईंटच्या दरातील आदिवासी भागातील बांधव हे आपली गाई गुरे घेऊन त्या परिसरात फिरत असताना त्यांना त्या परिसरात दुर्गंधी,वास येऊ लागला त्यावेळी त्यांनी लगेच माथेरान पोलीस ठाण्यात संपर्क केला.पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले.संध्याकाळ झाली असताना मृतदेह अडकलेल्या ठिकाणी जाणे फार जिकरीचे होते.सहायक पोलिस निरीक्षक संजय बांगर व दंगल विरोधी पथकाचे जवान हे खोल दरीमध्ये गेले पण तिथपर्यंत पोहोचणे जमले नाही,

.सह्याद्री रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नाने त्यांनी पहाटे तीन वाजता तो मृतदेह दरी बाहेर काढला हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.व रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना खुपच परिश्रम घ्यावे लागले.त्या युवकाचा मृतदेह अखेर पहाटे चार वाजता माथेरान मधीलबी.जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.त्याच्या अंगावरील कपडे,त्याच्या हातामधील घड्याळ,त्याच्या कमरेला असलेला बेल्ट व मोबाईल ह्या सर्व मिळालेल्या पुरव्याने हा मृतदेह रविवारी दि.२६ रोजी बेपत्ता झालेल्या तरुणाचा आहे हे पोलिसांच्या निदर्शनास आले. आज शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आला.

परंतु माथेरान नगरपरिषदेची जबाबदारी काही आहे की नाही माथेरान मध्ये बरेच पॉइंट आहेत तेथेच सी सी कॅमेरे लावण्यात आले पाहिजे तसेच ज्या ठिकाणी वॉल कंपाऊंड असतील किंवा नसतील ते करण्यात आले पाहिजे काय ठिकाणी तारेचे कंपाउंड केले पाहिजेत थंड हवेचे ठिकाण असून तिथे लोक मन मोकले पणाने     फॅमिली ला फिरायला घेऊन येत असतात सर्वांनाच असे माहीत नसते येथील परिस्थिती काय आहे जर आपण पर्यटन स्थल सर्वांसाठी खुले आहे तेथील व्यवस्थापन तसेच केले पाहिजे फिरण्यास माणूस येतो आणि अखेर त्याची माणसं मृत्यू बॉडी घेऊन जातात हे कितपत योग्य आहे माथेरान नगरपरिषदेने योग्य ते पाऊल उचलून फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना योग्य तो सल्ला दिला तर अशा घटना पासून पर्यटकांचे जीव डोक्यात येणार नाही

Post a Comment

Previous Post Next Post