गारमाल येथील सुप्रिया फार्मस कंपनीचा शासनमान्य रस्ता विनापरवाना बंद करण्याचा घाट

नागरिक  झाले आक्रमक आता  लक्ष तहसिल कार्यालयाच्या सुनावणी कडे ..  




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील

             बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण समाजाला जाणाऱ्या गारमाल वाघरणवाडी येथे सुप्रिया फार्मस  कंपनीने आपल्या व्यवसायला अडचण ठरणाऱ्या शासन मान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद करीत रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण करीत येथील नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे चित्र उभे केले आहे.

 मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते त्यामुळे प्रकल्प कसा उभा करायचा ते या कंपनीने पाहावे आमचा शासनमान्य रस्ता आहे तोच ठेवावा अशी मागणी करीत या बाबत तहसील कार्यालयात तक्रार दाखल करीत सुनावणी झाली असता 22 तारखेची पुन्हा सुनावणी ची तारीख दिल्याने येथील नागरिकांचे तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे 

                  गारमाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असल्याने   येथील जमिनी खरेदी करून  सध्या काम करणाऱ्या सुप्रिया फार्मस  या बांधकाम कंपनी  मार्फत बंगलो सिस्टीम केल्याने मुंबई सह अनेक ठिकाणच्या धनिकांनी हे बंगले खरेदी केल्याने व्यवसायात ग्राहकांना अडचण करीत असलेला जिल्हा परिषदेचा रस्ता ज्या रस्त्यावर नागरिकांना जाण्या येण्याची सुविधा असणारा शासनाने मंजूर करून लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या 500 मीटर रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद करीत मार्ग बदलल्याने नागरिकांची दिशाभूल होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post