न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे हरेश म्हात्रे विराजमान



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल (सुनील पाटील) :  न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरेश्वर म्हात्रे यांची बिन विरोध निवड झाली आहे.   युतीत ठरलेल्या तत्त्वानुसार जितेंद्र म्हात्रे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. पूर्वी ठरल्याप्रमाणे दोन वर्षासाठी भाजपला सरपंच पदाची टर्म वाटून घेतल्याने आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपचे हरेश्वर म्हात्रे यांची अपेक्षेप्रमाणे बिन विरोध निवड झाली.

निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी सरपंचपदी हरेश्वर म्हात्रे यांची निवड झाल्याचे जाहीर करताच फटाक्यांची आतषबाजी करत सर्व पक्षियांनी त्यांचे अभिनंदन केले.  

नवनिर्वाचित सरपंच हरेश्वर म्हात्रे यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे वचन दिले. मावळते सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी हरेश्वर म्हात्रे यांना शुभेच्छा देताना आपले सहकार्य यापुढेही असेच राहणार असल्याची ग्वाही दिली. माजी सरपंच व न्हावे ग्रामविकास आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर यांनी, आपण न्हावे  ग्रामपंचायतचे दोन वेळा सरपंच पद भूषविले असल्याने आपल्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायतीला होईल असा विश्वास व्यक्त केला. निर्मला काशिनाथ ठाकूर यांनी हरेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन करून ग्रामपंचयतीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post