प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल : सुनील पाटील :
माथेरानरान डोंगराच्या कुशीत मध्ये वसलेल बेकरेवाडी हे एक लहानसे गाव आहे या गावामध्ये येण्यासाठी योग्य तो रस्ता सुध्दा नाही. तर अशा गावामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी येतात ते जिवाची काटकसर करून येतात.
काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाटसह जोरदार वादळी पाऊस झाल्याने रायगड जिल्हा परिषद बेकरेवाडी या शाळेवर झाड कोसळले.सुद्धैवाने शाळेच्या समोरच्या बाजूस झाड कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला . हा आदिवासी भाग आतिशय दुर्मिळ भाग आहे येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिले जात आहे. या घटनेमुळे पालक वर्गातून भीती व्येक्त करण्यात येत आहे. या बाबत समाजिक कार्यकर्ते जैतू पारधी तसेच गणेश पारधी यांनी झाड शाळे वरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी शासनाकडे केली आहे.