प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
कर्जत तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा उपलब्ध होत्या सध्या कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाने खबरदारीचा उपाय म्हणून आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे
मागील वर्षात कोरोना वर मत करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने महत्वाची भूमिका बजावली होती त्या वेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णासाठी ५० खाटा तयार ठेवण्यात आल्या होत्या त्यात डिसेंबर २०२० मध्ये कर्जत रुग्णालयात केंद्र शासनाच्या पीएम केअर फंडातून आणि स्थानिक आमदार यांच्या निधीमधून व्हेटिलेटर उपलब्ध झाले होते त्यातुन आयसीयू व्हेंटिलेटसह परीपूर्ण असलेला १० बेडचा विषेश वाँड तयार करण्यात आले होता त्यात तिसरी लाट हि लहान मुलाना बाधा पोहाचविणारी आहे आसे आरोग्य
यंत्रणाने सागितल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात १० बेडचा विषेश वाँड कोविड मध्ये लहान मुलांवर उपचार करण्यासाठी सिद्ध केला त्या वाँर्डमध्ये मिनी व्हेटिलेटर आणि लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून देण्यात आली कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज बनसोडे यांनी परिसरातील रिसाँर्ट मालकांच्या माध्यमातून कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता वाँड कोविड वाँड लहान मुलांसाठी बनविण्यात आलेले वाँड यांना कोणत्याही खंड न पडता आँक्सिजन सिस्टीम कार्यान्वित करून घेतली आहे २०२० मध्ये अशी सुविधा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नव्हती त्या वेळी आँक्सिजनाची गरज असलेल्या रुग्णांना सिलिंडरमधून आँक्सिजनचा पुरवठा केला जात होता
आता कर्जत विधानसभा आमदार निधीमधून कोविड रुग्णांसाठी सर्व सोयीसुविध यांनी परिपूर्ण असा कोविड वाँड तयार आहे त्या नवीन वाँर्डमध्ये ३० बेड आणि सेंट्रल आँक्सिजनची सुविधा दिली गेली आहे त्या वाँर्डचे लोकार्पण अद्याप झाले नाही पंरतु कोविडची तिसरी लाट आल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालय पुर्ण क्षमतेने तयार आहे नवीन वाँर्डचे लोकांर्पण लवकरच केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी दिली दरम्यान कर्जतसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी कोविड रुग्णांवर मुंबई किंवा नवी मुंबईत जाऊन उपचार घेण्याची गरज भासणार नाही असे नियोजन असून कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालय सज्ज असल्याचे दिसून येत आहे