ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधारकार्ड महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी कामांसह खासगी कामांसाठीही आधार कार्डची गरज असते. मोठ्यांसह अगदी नवजात बाळाचंही आधार कार्ड बनवता येतं.UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, 5 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी Blue Aadhaar किंवा Baal Aadhaar Card मिळतं. मुलाच्या 5 वर्षांनंतर हे बाल आधार अमान्य ठरतं. त्यानंतर ते पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी बायोमेट्रिकची गरज असते. 5 वर्षाहून कमी वय असलेल्या लहान मुलांच्या आधार कार्डसाठी अर्ज करता येतो.
जवळच्या आधार केंद्रात जावून फॉर्म भरावा लागतो. मुलांसाठी आधार कार्ड फ्रीमध्ये दिलं जातं. 5 वर्षाहून कमी वयोगटातील मुलांचा कोणताही बायोमेट्रिक डेटा कॅप्चर केला जात नाही. या साठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.Blue Aadhaar Card साठी आवश्यक कागदपत्र - 5
वर्षाहून लहान मुलांच्या आधारसाठी अर्ज करताना मुलाच्या जन्माचं प्रमाणपत्र किंवा मुलाच्या शाळेतील फोटो ID आवश्यक असतो. त्याशिवाय आई-वडिलांच्या आधार कार्डचे डिटेल्सही असणं गरजेचं आहे. असा करा ऑफलाइन अर्ज - - सर्वात आधी जवळच्या आधार केंद्रावर जावं लागेल. - त्यानंतर अर्ज भरावा लागेल.
- पालकांना आपलं कार्ड आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. - बायोमेट्रिकची आवश्यकता नसल्याने मुलाचा केवळ फोटो काढला जाईल. - सर्व डॉक्युमेंट्सचं वेरिफिकेशन होईल. वेरिफिकेशननंतर आई-वडिलांद्वारा दिलेल्या फोन नंबरवर एक मेसेज येईल.
- त्यानंतर 60 दिवसांच्या आत मुलाचं आधार कार्ड मिळेल. ऑनलाइन असा करा अर्ज - - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जा. - त्यानंतर Aadhaar Card रजिस्ट्रेशन पर्यायावर जा. - आता मुलाचं नाव, पालकांचा मोबाइल नंबर आणि पालकांचा ईमेल आयडी टाकावा लागेल. - त्यानंतर Fix Appointment बटणावर क्लिक करा.

Tags
New Delhi