प्रेस मीडिया वृत्तसेवा :
नवी दिल्ली – आयकर विभागाने अहमदाबाद मधील एका बांधकाम व्यवसायिकाच्या तसेच त्याच्याशी संबंधीत ठिकाणांवरील छाप्यात पाचशे कोटी रूपयांचे कर चुकवेगीरीचे व्यवहार उघड झाले आहेत.
हा व्यावसायिक आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या ब्रोकरच्या 22 ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले. त्यात एकूण पाचशे कोटी रूपयांचे व्यवहार बेकायदेशीरपणे झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या छाप्याच्यावेळी सुमारे 1 कोटी रूपयांची रोकड आणि 98 लाखांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. या लोकांची 24 लॉकर्सही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यातून आणखीही काही घबाड हाती लागण्याची शक्यता आहे असेही आयकर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या व्यावसायिकांनी जमिनींमध्ये दोनशे कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचीही कागदपत्रे आयकर अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.