बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी दंडामध्ये जबरदस्त वाढ करण्याचा निर्णय .

 दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यास आणि कार चालवताना सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

बेशिस्त वाहन चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी दंडामध्ये जबरदस्त वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे.दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यास आणि कार चालवताना सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

बेशिस्त वाहन चालकांना लगाम लावण्यासाठी नवीन नियमावली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आठवडय़ापासून नवीन नियमांची अंमलबजावणी होईल. विनाहेल्मेट आढळणाऱ्या दुचाकीस्वारांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द होईल. मद्यपान करून वाहन चालवल्यास न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिने तुरुंगवास किंवा दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असाच गुन्हा केल्यास दोन वर्षे तुरुंगवास आणि किंवा 15 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येईल. मात्र अजून नवीन आदेश अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत. पुढील आठवडय़ात नवीन नियमावली जाहीर होईल असे वृत्त आहे.

Post a Comment

Previous Post Next Post