एकाची आत्महत्या तर दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :
मुंबई : - आपल्या देशात चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर चाहत्यांचे प्रचंड प्रेम असते. आपल्या आवडत्या कलाकाराला डोक्यावर घेऊन नाचवायला जनता कमी करत नाही. हिंदी चित्रपटसृष्टी, अर्थात बॉलिवूड मधील तसंच टीव्ही कलाकारांची एक झलक बघायला मिळण्यासाठी लोक झुंबड करतात.दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर चाहते जीव ओवाळून टाकायला तयार असतात. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात तर चंदेरी दुनियेला अनेक मोठे धक्के बसले आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकारांना कोरोनाने हिरावून घेतलं, तर काहींनी आत्महत्या करण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. याच काळात अगदी तरुण कलाकारांचे आकस्मिक निधन होण्याच्याही धक्कादायक घटनांनी सर्वांनाच हादरवून टाकलं.
अशीच एक हादरवून टाकणारी घटना शुक्रवारी 29 ऑक्टोबर 2021 ला दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत घडली. ती म्हणजे कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचं शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चाहत्यांमध्ये अप्पू या नावानं प्रसिद्ध असलेल्या पुनीतच्या निधनाचा धक्का त्याच्या चाहत्यांना इतका बसला की एकाने आत्महत्या केली, तर दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आणखी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा जीव वाचवण्यात यश आलं.पुनीत राजकुमार अवघा 46 वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा पुत्र होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1985 मध्ये तो 'बेट्टाडा होवू' चित्रपटात दिसला होता.
या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सुवरत्थान' या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. या चित्रपटासाठी त्याची खूप प्रशंसा झाली होती.
पुनीत राजकुमार चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. अप्पू म्हणून तो प्रसिद्ध होता. लाखो लोक त्याचे चाहते होते. त्याच्या अकस्मात निधनानं चाहत्यांना प्रचंड धक्का बसला.सगळीकडे एकच शोककळा पसरली.
मुनि अप्पा 7 वर्षांपासून बेंगळुरूमध्ये किरकोळ नोकऱ्या करत होता; पण लॉकडाउनमुळे तो 2 वर्षांपूर्वी त्याच्या मूळ गावी परतला होता. त्यानं पुनीत राजकुमार एकही चित्रपट चुकवला नव्हता. मुनियप्पाच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. पुनीत राजकुमारच्या मृत्यूनंतर चाहत्यांचा आक्रोश; 'अप्पू'ला शेवटचं पाहून अश्रू) बेळगावी जिल्ह्यातील अथणी इथं राहुल गाडीवड्डारा यांनी काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने धक्का बसलेल्या राहुल यांनी पुनीतचा फोटो फुलांनी सजवला आणि नंतर गळफास घेतला.उडुपी जिल्ह्यातील साळीग्राम गावातील सतीश नामक एका 35 वर्षांच्या ऑटोरिक्षा चालकाने पुनीतच्या मृत्यूची बातमी कळताच दुःखावेगाने आपला हात रिक्षावर जोरात आपटला. त्याला मोठी जखम होऊन प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. पुनीतला आपण अशी आदरांजली वाहत असल्याचं त्यानं सांगितलं.बेळगावी जिल्ह्यातील शिंदोली गावात परशुराम देमन्ननावर हे पुनीतचे कट्टर चाहते होते. त्याच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर बघत असताना ते सतत रडत होते. रात्री ११ वाजता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.