मिरज प्रतिनिधी :धनंजय हलकर (शिंदे)
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मिरजेतील रंगशारदा हॉलमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा व मिरज शहर यांच्या वतीने मराठा समाज चिंतन शिबिर व नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष यांचा सत्कार संपन्न झाला या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नरेंद्रजी पाटील यांनी महाविकास आघाडी वर सडकून टीका केली मराठा आरक्षण तत्कालीन मागील सरकारने दिले त्या आरक्षण सध्याच्या महाविकासआघाडी ने घालविले मराठा समाजामध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते आहेत आपण त्या सर्व कार्यकर्त्यांनी आधी समाजाचे विचार करावा नंतर पक्षाचा विचार करावा असे आवाहनही यावेळी नरेंद्र पाटील यांनी केले तर राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मराठा समाजाच्या अडचणी सांगितल्या विद्यार्थी वर्गाच्या कोणकोणते प्रश्न सरकार करून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत याची माहिती दिली व समाजातील सर्व तळागाळातील घटकांनी समाजासाठी पुढे येण्याचे आवाहन केले या मेळाव्याला मराठा समाजातील अनेक नेते पदाधिकारी व सदस्यांची महिला पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या कार्यक्रमाचे संयोजक टीम अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नेताजी (मामा) सुर्यवंशी अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हाध्यक्ष अभिजित शिंदे, मिरज शहराध्यक्ष धनंजय हलकर (शिंदे), मिरज तालुका अध्यक्ष अमोल पाटील, सांगली जिल्हा खजिनदार विजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस किशोर धनवडे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.