प्रेस मीडिया वृत्तसेवा : धनंजय हलकर (शिंदे)
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मिरज विभागाची सर्वसाधारण आढावा बैठक मिरज महापालिका कार्यालयात पार पडली या बैठकीचे आयोजन स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी केले होते महापालिकेच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मिरजेतील सर्व नगरसेवकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते .
या बैठकीमध्ये पिण्याचे पाणी अमृत योजना खराब रस्ते ड्रेनेज समस्या या विषयांवर ही बैठक घेण्यात आली या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोर मिरज शहराला भेडसावत असणाऱ्या प्रमुख प्रश्न मांडण्यात आले यावर लवकरात लवकर तोडगा काढून मिरजकर नागरिकांचे समस्यांचे निरसन करण्याची सूचना आणि आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले यात महत्वाचे पिण्याचे येणारे दूषित पाणी, नागरिकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचे पोचवायचे टायमिंग,मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रकार , डॉग व्हॅन चा प्रश्न, ड्रेनेज तुंबण्याचा प्रश्न, खराब रस्त्यांचा प्रश्न, अमृत योजनेतील कमी दाबाने पाणी पुरवठ्याचा प्रश्न,कचरा उठाव करण्याचा प्रश्न,हे आपापल्या प्रभागातील प्रश्न नगरसेवकांनी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना येत्या आठ दिवसांत हे प्रभागातील प्रश्न मिटविण्याच्या सूचना देण्यात आल्या, यांच बरोबर महापालिकेतील तिन्ही शहरात ही अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठक घेणार असल्याचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी सांगितले .
शिवाय खेळाडूंसाठी मिरजेतील छ शिवाजी स्टेडियम च्या बाबतीत लवकरच आढावा घेतला जाईल,छ शिवाजी स्टेडियम चे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने याबाबत लक्ष घालणार असल्याचे ही सांगितले शिवाय न्यू इंग्लिश स्कुल च्या पाठीमागील बाजूस असलेल्या महापालिकेच्या जागेत क्रीडा संकुलाच्या धर्तीवर मल्टिपल स्टेडियम बांधण्याचा विचार असल्याची माहिती दिली या स्टेडियम मध्ये सर्वच खेळाची मैदाने तयार करण्याचा मानस असल्याचे सांगितले, तर शहरातील विविध चौकांचे सुशोभी करणासाठी विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था ,कार्यालये आणि संघटना पुढे येऊन चौक सुशोभीकरण करावे असे आवाहन करण्यात आले.
नवीन रस्ते करण्यात आलेले पावसाने खराब झाल्याने पुन्हा एकदा परत रस्ते बनविणार असल्याची माहिती दिली, तर येत्या वर्षभरात मिरज शहरातील दोन प्रमुख मार्गांचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली,त्यामध्ये गुरुवार पेठ मधील मार्ग,तर मंगळवारपेठ मधील चर्च रोड चा मार्ग रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली त्याशिवाय शहरातील महत्वाची उद्याने विकसित करणार असल्याची माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान रेल्वे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचे सांगितले या उद्यानात अनेक खेळणी ठेवून उद्या ना मागील मोकळा रस्त्यात मिनी खाऊ गल्ली करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे बोलून दाखवले एकंदरीत मिरज शहराची रूपरेषा पालट ठाण्याचा विचार असल्याचे सांगितले शिवाय गणेश तलाव मध्ये बोटिंग व्यवस्था करण्याची योजना विचाराधीन असल्याचे सांगितले शिवाय मिरजेतील प्रमुख भाजीमंडई चा प्रश्न लवकरात लवकर सोडवून येत्या काही दिवसात मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले