११आकटोम्बर महाराष्ट्र बंदला रिपब्लिकन युवा मोर्चाने पाठींबा देण्याची घोषणा



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

उत्तर भारतातील लखीमपूर खैरी येथील  न्याय मागण्यासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांना चिरडले त्याघटनेच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व औद्योगिक कारखाने, व्यापारी, संघटनांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे, या बंद ला पाठींबा देत असे आवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाने केले आहे.उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे वाहन अंगावर घालून शेतक-यांना चिरडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सोमवारी दि ११ आकटोम्बर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, त्यामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चा देखील सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केले.

शिवशंकर उबाळे, भारत मिरपगारे, ज्ञानेश्वर बोराटे, अमोल डंबाळे, मेघा आठवले, गंगा चलवादी, बाळासाहेब जाधव, राम ठोके आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post