प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
उत्तर प्रदेशात लखीमपूर खैरी येथे झालेल्या अमानवीय हिंसाचार प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लखीमपूर खैरी येथे झालेल्या क्रूर व अमाणवीय हिंसाचारात एकूण आठ निरपराध जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा असा महाआरोप आहे. ही घटना अत्यंत दुःखद व निंदनीय आहे, सोमवारपासून काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते लखीमपूर खेरी येथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु उत्तर प्रदेश सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना तिथे जाऊ देत नाहीत.असाही आरोप होत आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. यानुसार ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळला जाणार आहे.