प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :
कुरुंदवाड - अवैध गुटखा वाहतुक करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला जामिनासाठी व गुन्हयात मदत करण्यासाठी कुरुंदवाड येथील सहायक फौजदारने ५० हजारची लाच मागितली होती. त्यापैकी ४० हजारची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहायक फौजदारासह पंटरला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, तक्रारदाच्या भावावर कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे अवैध गुटखा वाहतुक करण्याच्या आरोपाखाली कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाणेचे सहायक फौजदार राजेंद्र शंकर उगलमुगले (रा.विकास कॉलनी, जयसिगपूर, ता.शिरोळ) यांचेकडे देण्यात आला आहे. राजेंद्र उगलमुगले यांनी तक्रारदार यांचे भावास जामिनासाठी व गुन्हयात मदत करणेसाठी ५० हजार रुपये लाच रक्कम मागितली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच रक्कम पंटर अप्पसाहेब सुभाष मगदूम (वय 40,रा.कुरुंदवाड, ता.शिरोळ) याच्यामार्फत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पंटरला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप- अधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोहेकॉ शरद पोरे, पोना सुनिल घोसाळकर,पोकॉ नवनाथ कदम, पोकॉ मयुर देसाई यांच्या पथकाने केली.