प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : दि.२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर हा आठवडा हेरिटेज सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने तसेच महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त दि.२ ऑक्टोबर रोजी मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या नेतृत्वा खाली नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने हेरीटेज वास्तु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल इमारत आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी आणि उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचगंगा नदी घाट, पुरवठा कार्यालय (स्वातंत्र्यपूर्व तुरुंग) इत्यादी १९ ठिकाणी भेट देवुन त्याठिकाणची स्वच्छता करणे आली.
आजच्या स्वच्छता मोहीमेत उप मुख्याधिकारी केतन गुजर,नगर अभियंता संजय बागडे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगरअभियंता भागवत सांगोलकर , सहा.नगररचनाकार रणजित कोरे,लेखापरीक्षक नितीन सरगर,मुख्य स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत चव्हाण, विश्वास हेगडे,रचना सहाय्यक नितीन देसाई, खरेदी पर्यवेक्षक प्रतापराव पवार, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे,उद्यान पर्यवेक्षक संपत चव्हाण, महेश बुचडे यांचेसह आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.